नवनीत राणा खासदार अमरावती: मोठी बातमी! खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुन्हा करोना पॉझिटिव्ह – mp navneet rana and mla ravi rana again tested covid positive
अमरावती : अमरावती जिल्ह्यात सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असलेले राणा दांपत्य सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात. १२ जानेवारी रोजी सकाळी कॅम्प परिसरातील जिजाऊ तीर्थावर एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जाहीरपणे सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यावरून वादंग निर्माण झाला होता.
दरम्यान, नुकतेच अमरावती जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सुद्धा जाहीर झाला. निवडणूक, जाहीर सभा, समारंभ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर निर्माण झालेल्या वादांना राणा दांपत्य मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात आले होते. आज शनिवारी राणा दाम्पत्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आली आहे. Breaking : उसाचा रस पिताना भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी, चाकू रोखला अन्… सभा समारंभ व निवडणुकीच्या जल्लोषालामुळे संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांनी आपली खबरदारी म्हणून करोना चाचणी करून घ्यावी असे आव्हान राणा दाम्पत्यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ५२५ नवे कोरोना बाधित रूग्ण असून एकूण रुग्ण संख्या ही २४२४ वर गेली आहे.
सातत्याने वाढणारी रुग्ण संख्या चिंता निर्माण करणारी असली तरी बरे होण्याचे प्रमाणही ९५.९७ एवढे आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या ९९ हजार ८६९ झाली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा मुख्य पट्टीचा वापर करा व कोव्हिड नियमांचे पालन करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.