हायलाइट्स:

  • शिवसेना खासदाराला फोनवरून धमकी
  • खासदार विनायक राऊत यांना धमकी दिल्याचे उघड
  • राणे समर्थक असल्याचे सांगून धमकावत असल्याची राऊत यांची माहिती
  • मुंबईतील वाकोला पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी: कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी यांना काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही धमकी दिल्याची धक्कादायक माहिती स्वतः राऊत यांनीच दिली आहे. आपण राणे यांचे समर्थक असल्याचे सांगून ती व्यक्ती धमकावत होती, असेही ते म्हणाले. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कोकणातील शिवसेना नेत्यांना धमकावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. राजापूरचे आमदार आणि शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनाही काही दिवसांपूर्वी फोनवरून धमकी देण्यात आली होती. आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही धमकावण्यात आल्याचे समोर आले आहेत. याबाबत विनायक राऊत यांनी रत्नागिरीत ही माहिती दिली. मात्र, धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

dalvi vs kadam: बंगाली विद्या नाही, तर जनतेची विद्या चालली; दळवींचा कदम यांना टोला
जिल्हा रुग्णालयातून तब्बल १३ ड्युरा सिलेंडर गायब; भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ

आपल्याला फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राणे समर्थक असल्याचे सांगून आरोपी वारंवार फोनवरून धमकी देत होता, असा दावा राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्गमधील नगरपंचायतीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. त्यामुळे फोन करून धमकी देणारे वाढले आहेत. याबाबत मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. वाकोला पोलिसांनी या आरोपीला आठ तासांच्या आत ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

निकाल लागला, आता कोकणात शिवसेनेत पुन्हा मोठा कलह; आमदारानं केला गंभीर आरोप

मंडणगड नगरपंचायतीत शहर विकास आघाडीला सात जागांवर यश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली. यापूर्वी मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला होता; मात्र आता ते महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी प्रथमच संवाद साधणार आहेत. शिवसेनेला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ते पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here