हायलाइट्स:

  • पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तूर्त बंदच राहणार
  • पालकमंत्र्यांच्या करोना आढावा बैठकीत निर्णय
  • रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत पुढील बैठकीत निर्णय

करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच (पुणे Schools colleges update) ठेवण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज, शनिवारी करोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्यातल्या सर्व शाळा येत्या सोमवारपासून २४ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुण्यातील सध्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के आहे. किमान आठ दिवस तरी पुण्यातील वाढती रुग्णसंख्या कमी होणार नसल्याची आरोग्य विभागाची माहिती असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. रुग्णसंख्या वाढते आहे मात्र रुग्णालयात दाखल रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही खबरदारी म्हणून तूर्त पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाळांसंबंधीची माहिती सोशल मिडीयाद्वारे दिली. त्यांनी ट्विट करत सांगितले की, ‘करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.’

दरम्यान, राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राथमिकता असून कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

दुसरीकडे, राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीआधी सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. करोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. यानुसार राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कॉलेजे ऑफलाइन सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर कॉलेजे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

शाळा उघडणार; आता लक्ष कॉलेजांकडे!
राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार; राज्य सरकारचा हिरवा कंदील
‘या’ शहरात आणखी दहा दिवस शाळा उघडणार नाही; परिस्थिती पाहून निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here