हायलाइट्स:

  • मध्य रेल्वेवर १४ तासांचा मेगाब्लॉक
  • ठाणे – दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक
  • जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक नियोजन जाणून घ्या
  • मेगाब्लॉक कधी आणि कुठे घेणार याबाबत डिटेल्स

कल्पेश गोर्डे | ठाणे : मध्य रेल्वेवरील ठाणे आणि दिवा या स्थानकांदरम्यान (Central रेल्वे मेगा ब्लॉक) येत्या रविवारी, २३ जानेवारी रोजी पायाभूत सुविधांसाठी पुन्हा १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान डाउन जलद मार्गावर आणि अप जलद मार्गावर ५ व्या आणि ६ व्या जुन्या आणि नवीन मार्गिकेच्या जोडणीचे काम केले जाणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान ठाणे आणि दिवा दरम्यानच्या धीम्या मार्गावरील स्थानकांवर सुरळीत वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र या १४ तासांच्या मेगाब्लॉकसाठी जलद मार्गावरील काही ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत.

ठाणे आणि दिवा दरम्यान ५ व्या आणि ६ व्या डाऊन आणि अप जलद मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून पुन्हा १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईहून कर्जत, कसारा, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळाकडील डाऊन मार्गावर रविवार २३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपासून, दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्याच बरोबर कर्जत, कसारा, अंबरनाथ, टिटवाळा, कल्याण, डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने अप जलद मार्गावर २३ जानेवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपासून ते २ वाजून ३० मिनिटांपर्यंत २ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीत दिवा ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहील. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.

‘एरोली-काटई’चा पहिला टप्पा वर्षाखेरीस

डोंबिवलीकरांचा प्रवास होणार सुखकर; युद्धपातळीवर काम सुरु

ब्लॉक सुरू झाल्यानंतर…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २३ जानेवारी रोजी पहाटे २ पासून ते ब्लॉक अवधी पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणाऱ्या उपनगरीय व मेल, एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. कल्याणकडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. ठाण्यातील प्रवाशांना दादर, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरून संबंधित गाड्यांमधून प्रवासाची परवानगी आहे.

ठाणे जिल्ह्यात ३८.४२ टक्के नागरिकांनी घेतला बूस्टर डोस

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी…

दादर येथून २२ जानेवारी रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते २३ जानेवारी रोजी पहाटे २ वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद उपनगरीय व मेल, एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. डाऊन मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. ११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस न वळवता आपल्या नियोजित डाऊन जलद मार्गाने व आपल्या नियोजित थांब्यांसह धावेल. २३ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ नंतर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या कल्याणकडे जाणाऱ्या डाऊन मेल, एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील व ह्या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. कोकणाकडे जाणाऱ्या डाऊन मेल एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर थांबतील आणि पुढे जातील.

ब्लॉकनंतर ट्रेनचे वेळापत्रक

ब्लॉकनंतर, कल्याणकडे जाणाऱ्या डाऊन जलद उपनगरीय व मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे फलाट क्रमांक ५ मार्गे ठाणे – दिवा विभागातील नवीन डाऊन जलद अलाइनमेंटवर कळवा आणि मुंब्रा स्थानकांमधून धावतील. ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर/ लोकमान्य टिळक टर्मिनसहून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन गाड्या डाऊन फास्ट मार्गावरून किंवा ५ व्या मार्गावरून ठाणे येथे फलाट क्रमांक ७ वर येतील आणि नवीन ५ व्या मार्गाने (पूर्वीचा डाऊन जलद मार्ग) पारसिक बोगद्यामधून जातील.

२२ जानेवारी रोजी या एक्स्प्रेस रद्द

१७६१८ नांदेड – मुंबई तपोवन एक्स्प्रेस
११०३० कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस
१२१४० नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

२३ जानेवारी रोजी या एक्स्प्रेस रद्द

२२१०५ / २२१०६ मुंबई – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
22119 / 22120 मुंबई – करमाळी – मुंबई तेजस एक्सप्रेस
11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
१७६१७ मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस
१२०७१ / १२०७२ मुंबई – जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
११०२९ मुंबई – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
१२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

पनवेल येथे थांबणाऱ्या (शॉर्ट टर्मिनेशन) एक्स्प्रेस गाड्या..

१६३४६ तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस २१ जानेवारी रोजी सुटणारी
१२०५२ मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस २२ जानेवारी रोजी सुटणारी
१०११२ मडगाव – मुंबई कोकण कन्या एक्स्प्रेस २२ जानेवारी रोजी सुटणारी

पनवेलहून सुटणाऱ्या (शॉर्ट ओरिजिनेशन) एक्स्प्रेस गाड्या..

१६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस २३ जानेवारी रोजी सुटणारी
१२०५१ मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस २३ जानेवारी रोजी सुटणारी
१०१०३ मुंबई – मडगाव मांडवी एक्स्प्रेस २३ जानेवारी रोजी सुटणारी

ठाणे-पालघरमध्ये राष्ट्रीय लोकअदालत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here