औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाणे हद्दीत ११ दिवसांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, बहिणीला त्रास देणाऱ्या मेव्हण्याचा साल्यानेच काटा काढला असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर कडूबा विठ्ठल सोळुंके (रा. चिमनापूर ता. कन्नड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे गेली दोन आठवडे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे पथक विविध जिल्ह्यात फिरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जानेवारी रोजी सिल्लोड चाळीसगाव रस्त्याला लागून नेवपूर येथील पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य गेटजवळ ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. या तरुणाचा गळा आवळून धारधार शस्त्राने वार करून निर्दयीपणे खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, खुनातील तरुणाची ओळख न पटल्याने तरुणाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पिशोर पोलिसांसमोर होते. त्यामुळे यासाठी पथक तयार करत बाजूच्या जिल्ह्यात सुद्धा शोधमोहीम करण्यात आली. पण यश येत नव्हतं.

Breaking : उसाचा रस पिताना भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी, चाकू रोखला अन्…
दरम्यान, पोलिसांनी गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून मयताच्या कपड्यावरुन त्याची ओळख पटवली. त्यानंतर तांत्रिक दृष्ट्या आणि सबळ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी मयत सोळुंके याचा साला सोमीनाथ राजधर खांदवे याला ताब्यात घेतले. तसेच खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. कडूबा विठ्ठल सोळुंके हा आपल्या बहिणीला त्रास देत असल्यानेच त्याचा खून केल्याचं सोमीनाथने कबुली दिली असल्याचं पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे.

असा केला गेम…

घटनेच्या रात्री आरोपी व मयत या दोघा साला-मेव्हण्याने सोबतच दारु पिऊन जेवण केले होते. यावेळी त्यांच्यात तू माझ्या बहिणीला त्रास देतो, या कारणावरून भांडण झाले. त्यानंतर आरोपी सोमीनाथ खांदवे याने गोड बोलून नेवपूर प्रकल्पाच्या खाली नेऊन कडूबा सोळुंकेचा आधी गळा आवळला त्यानंतर धारधार शस्त्राने वार करून खून केला.

मोठी बातमी! खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पुन्हा करोना पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here