हायलाइट्स:

  • पलक तिवारी इब्राहिम खानच्या नात्यात?
  • शुक्रवारी रात्री दोघे गेले डिनर डेटवर
  • फोटोग्राफर्सना पाहून पलकने लपवला चेहरा

मुंबई- अभिनेत्री श्वेता तिवारी ची मुलगी पलक तिवारी तिच्या ‘बिजली’ या म्युझिकल अल्बममुळे चर्चेत आली. आता पुन्हा एकदा पलक चर्चेत आली आहे, ती शुक्रवारी रात्री घडलेल्या एका घटनेमुळे. पलक शुक्रवारी रात्री उशीरा वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेली होती. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत सैफ अली खानचा साहबजादा इब्राहिम अली खान होईल.

‘मी सच्चा देशभक्त..’ वक्तव्य करणारा नथुराम गोडसे कोण होता?

इतकंच नाही तर दोघेजण त्यांच्या डिनर डेटनंतर एकाच गाडीतून गेले. यावेळी तिथे असलेल्या फोटोग्राफर्स दोघांचे एकत्र फोटो काढू लागले. आपले फोटो काढले जात आहेत, हे लक्षात आल्यावर पलकने हातांनी तिचा चेहरा झाकून घेण्याची अयशस्वी धडपड सुरू झाली. पलकची ही धडपड पाहून इब्राहिम गालातल्या गालात हसू लागला. हे सारे फोटो, व्हिडिओमध्ये दिसत असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ पाहून या दोघांमध्ये नेमके काय शिजत आहे, याची चर्चा सुरू झाली.

पलक - इब्राहिम


फोटोग्राफर्सपासून लपवला चेहरा

डिनर डेट झाल्यानंतर हॉटेलमधून पहिल्यांदा इब्राहिम बाहेर पडला आणि दुस-या दिशेने चालत गेला. त्यानंतर काही वेळाने पलक हॉटेलच्या बाहेर पडली. त्यानंतर हे दोघेजण गाडीच्या दिशेने गेले आणि एकाच गाडीमध्ये बसले. या दोघांना एकत्र पाहून तिथे असलेल्या फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढू लागले. तेव्हा पलकने तिचा चेहरा हाताने झाकून घेतला. तिची ही धडपड पाहून इब्राहिम गालातल्या गालात हसत होता.


इंडस्ट्रीमधील नवीन लवबर्ड्स?

आता प्रश्न असा उपस्थित होतो की, हे दोघेजण फक्त डिनर डेटसाठी गेले होते का? सध्या इब्राहिम देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. इब्राहिमच्या पदार्पणाच्या सिनेमात पलक त्याची हिरॉईन असणार आहे का, अशी ही चर्चा आहे. अर्थात या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सध्या तरी हे दोघेजण डिनर डेटवर गेले होते. यावेळी दोघांचाही लुक अतिशय स्टायलिश होता.

रश्मिकाच नाही तर साउथ मेगास्टारही करणार बॉलिवूड पदार्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here