हायलाइट्स:

  • भिवंडीमधील वज्रेश्वरी परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरले
  • वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या
  • भिवंडीतील गणेशपुरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
  • ओळखीच्या व्यक्तीने हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

ठाणे : ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे वृद्ध दाम्पत्य घरात दोघेच राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील अकलोली परिसरातील पेंढारपाडा येथे एका घरात वृद्ध पती-पत्नी राहत होते. त्या दोघांचीही धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. जगन्नाथ (बाळा) पाटील (वय ८३) आणि सत्यभामा पाटील (वय ७५) अशी दोघांची नावे आहेत. घराचा दरवाजा खुला असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना संशय आला. त्यांनी पाहणी केली असता, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले होते. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. भिवंडीतील गणेशपुरी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Ratnagiri News : घरात काय घडलंय ते कुणालाच ठाऊक नव्हते, शेजारी हळदी कुंकू होते; कपाट उघडल्यानंतर…
Vinayak Raut : शिवसेना खासदाराला धमकी, राणे समर्थक असल्याचे सांगून ‘तो’…धक्कादायक माहिती

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने तसेच होते. विशेष म्हणजे, ही घटना उघड झाली त्यावेळी घरातील टीव्ही सुरूच होता. चोरीच्या उद्देशाने दरोडेखोर किंवा चोरट्यांनी ही हत्या केली नसून, ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.

Mumbai Drugs: महिलांच्या कपड्यांमध्ये लपवले होते ३.९० किलो अंमली पदार्थ, ‘असा’ केला पर्दाफाश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here