या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मसिना, रिलायन्स आणि व्होकार्ट रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आम्ही सर्वप्रथम या तिन्ही रुग्णालयांच्या प्रशासनाला रुग्णांना का भरती करुन घेतले नाही, याचा जाब विचारु.

मुंबई आग

या रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार देणे हे धक्कादायक आणि उद्विग्न करणारे आहे.

हायलाइट्स:

  • या दुर्घटनेनंतर काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले
  • त्या वेळेला रुग्णालयांनी पैशांअभावी आणि कोविड टेस्ट अभावी त्यांना अॅडमिट करण्यास नकार दिला

मुंबई : ताडदेव परिसरातील कमला इमारतीला लागलेल्या आगीत होरपळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या दक्षिण मुंबईतील रुग्णालयांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. कमला इमारतीला शनिवारी सकाळी आग लागली. त्यानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरु होऊन जखमींना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले. यापैकी अनेकजण आगीत गंभीररित्या होरपळले होते. या जखमींवर तातडीने उपचार होणे आवश्यक होते. त्यामुळे या जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. परंतु, रिलायन्स, व्होकार्ट आणि मसिना या तीन रुग्णालयांनी जखमींना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर या रुग्णांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेकजण मसिना, रिलायन्स आणि व्होकार्ट रुग्णालयावर टीका करत आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मसिना, रिलायन्स आणि व्होकार्ट रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आम्ही सर्वप्रथम या तिन्ही रुग्णालयांच्या प्रशासनाला रुग्णांना का भरती करुन घेतले नाही, याचा जाब विचारु. त्यांचे उत्तर समाधानकारक नसेल तर रुग्णालयांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या रुग्णालयांच्या कारभारावर टीका केली. या रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार देणे हे धक्कादायक आणि उद्विग्न करणारे आहे. त्यामुळे जखमींवर उपचार करण्यास उशीर झाला आणि मृतांचा आकडा वाढला, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रुग्णालयांना अशाप्रकारे उपचार नाकारता येत नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे आता प्रशासन मसिना, रिलायन्स आणि व्होकार्ट रुग्णालयाविरोधात कोणती कठोर पावले उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबईतील ताडदेवमध्ये २० मजली इमारतीला आग, १० जण जखमी

नेमकं काय घडलं?

या दुर्घटनेनंतर काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. त्या वेळेला रुग्णालयांनी पैशांअभावी आणि कोविड टेस्ट अभावी त्यांना अॅडमिट करण्यास नकार दिल्याचं सचिनम हाईट्समधील रहिवाशांकडून सांगण्यात आले. मुंबई सेंट्रल येथील व्होकार्ट, रिलायन्स आणि भायखळा येथील मसिना हॉस्पिटल यांनी या रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचं स्थानिकांनी सांगितले. या नंतर जखमींना भाटिया, नायर आणि कस्तुरबा रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले.
Tardeo Fire: ताडदेव दुर्घटनेनंतर केंद्र सरकार मदतीसाठी पुढे सरसावले, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची भरपाई
या आगीत मितेश मिस्त्री, मंजूबेन कंठारिया, पुरूषोत्तम चोपडेकर यांच्यासह इतर तिघांचा मृत्यू झाला तर हंसा चोक्सी, फालगुणी चोक्सी, धावेल, यश चोक्सी, शुभांगी साळकर, दिलीप साळकर, ममता साळकर, तनिषा सावंत, अंकिता चौधरी, धनपत पंडित, गोपाळ चोपडेकर, स्नेहा चोपडेकर, वेदांगी चोपडेकर, मीना चव्हान, प्रतिमा नाईक, कल्पना नाडकर्णी, स्मीता नाडकर्णी, रुदया चोपडेकर, मनिश सिंग, मंजू खान्ना अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: मुंबई तारदेव आगीत जखमींवर उपचार करण्यास नकार दिल्याने वोक्हार्ट हॉस्पिटल रिलेन्स हॉस्पिटल आणि मसिना हॉस्पिटलवर कारवाई होऊ शकते.
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here