केंद्र आणि राज्य शासनाने एकत्रितपणे यावर स्वतंत्र धोरण करावे, त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. या जागेवरील रहिवाशांचे जोपर्यंत योग्य पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करुन दिली जाणार नाही, अशी भूमिका श्रीकांत शिंदे यांनी मांडली.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरातील सिद्धार्थ नगरमधील रहिवाशांची भेट घेतली.
हायलाइट्स:
- रेल्वे मंत्रालयाने देशभरातील आपापल्या विभागातील व्यवस्थापकांना आपल्या भागातील जागेवर असलेल्या अतिक्रमणाबाबत नोटिसा देण्याचे आदेश दिले होते
- कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या अशा रहिवाशांना नोटिसा देण्यात आल्या
तत्पूर्वी श्रीकांत शिंदे यांनी यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक गोयल यांच्यासमोरही अतिक्रमणाच्या नोटीस बजावण्यात आलेल्या रहिवाशांची बाजू मांडली.
या समस्येला एक आव्हान समजून त्याकडे त्यादृष्टीने पाहण्याची गरज असून केंद्र आणि राज्य शासनाने एकत्रितपणे यावर स्वतंत्र धोरण करावे, त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. या जागेवरील रहिवाशांचे जोपर्यंत योग्य पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करुन दिली जाणार नाही, अशी भूमिका श्रीकांत शिंदे यांनी मांडली.
सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला देशभरात त्यांच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणांबाबतची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आणि त्या जागा कशा मिळवता येतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचननेनंतर रेल्वे मंत्रालयाने देशभरातील आपापल्या विभागातील व्यवस्थापकांना आपल्या भागातील जागेवर असलेल्या अतिक्रमणाबाबत नोटिसा देण्याचे आदेश दिले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या अशा रहिवाशांना नोटिसा देण्यात आल्या. या नोटीसमुळे रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. कित्येक वर्षांपासून या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कुणालाही त्या ठिकाणाहून काढले जाणार नाही,असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रहिवाशांना दिले.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून