ऊन पावसाची पर्वा न करता शेकडो कामगार जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये-जा करतात. या कामगारांना दुसरा मार्ग २६ किलोमीटरचा वळसा घालून गाठावा लागतो. यामुळे वेळ आणि खर्चाचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी दोन गावातील शेकडो नागरिक दररोज या पुलावरून ये-जा करतात.

१० इंचाच्या तीन लोखंडी पाईपवरुनन खालून धोधो वाहणाऱ्या खोल नदीच्या पाण्याचा प्रवाह पाहत नागरिकांना ये-जा करावी लागते.
हायलाइट्स:
- एमआयडीसीकडून हा रस्ता स्व:तासाठी तयार करण्यात आल्याचे कारण देत हा रस्ता दुरुस्त करत नसल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे.
- एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, हा रस्ता धोकादायक असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाही
यामुळे ऊन पावसाची पर्वा न करता शेकडो कामगार जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये-जा करतात. या कामगारांना दुसरा मार्ग २६ किलोमीटरचा वळसा घालून गाठावा लागतो. यामुळे वेळ आणि खर्चाचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी दोन गावातील शेकडो नागरिक दररोज या पुलावरून ये-जा करतात. अतिशय धोकादायक असलेल्या या रस्त्यावरून लहान मुले आणि महिलांना दुसरीकडे जाण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते. दररोजची ही कसरत करताना नागरिक मेटाकुटीला आले असून तुटलेला हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. मात्र, एमआयडीसीकडून हा रस्ता स्व:तासाठी तयार करण्यात आल्याचे कारण देत हा रस्ता दुरुस्त करत नसल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, हा रस्ता धोकादायक असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाही. मात्र नागरिक जीव धोक्यात घालून या पुलावरून ये जा करत आहेत. या नदीवर शासनाच्या माध्यमातून पूल किंवा रस्ता झाल्यास या गावाचा शहराशी थेट संपर्क होऊ शकेल. मात्र अस्तित्वातील रस्ता धोकादायक असल्याने तो नागरिकांनी वापरू नये असे आवाहन एमआयडीसी अधिकार्यांनी केले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network