औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी भागातील ताजनापूर येथे मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. मित्रांसाठी बाय बाय स्टेटस ठेवत महाविद्यालयीन विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. राजेश ज्ञानेश्वर काळे (१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थी असणाऱ्या राजेशने घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले असताना आपल्या मोबाईलवर बाय बाय असे स्टेटस ठेवले, त्यानंतर आपल्या राहत्या घरात कापडाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेशचे स्टेटस पाहून गावातील मित्रांसह ग्रामस्थांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने तोपर्यंत घरात आत्महत्या केल्याचे आढळून आला. पुढील ८ दिवसांत करोनाचा धोका वाढण्याची शक्यता, पालकमंत्र्यांची माहिती त्यानंतर गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती बाजारसावंगी पोलीस चौकीस कळविल्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने राजेशचे प्रेत खाली उतरवले. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.