मुंबई: मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. काही वेळातच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि बंब घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्यात येत आहे. ‘हा कसोटीचा काळ आहे. मात्र, मनोबल ढळू शकत नाही. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. ही दुर्दैवी घटना आहे. सुदैवाची बाब म्हणजे, मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक सुरक्षित आहेत,’ असं मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times