चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हाला अवकाळी पावसाने झोडपून काढले. बळीराजाला मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. अवकाळीने डोळ्यात पाणी आनलेले असतांना एक वार्ता जिल्ह्यात धडकली. जिल्ह्यातील एक सूशिक्षित तरूण शेतकरी राज्यपातळीवर दिला जाणारा युवा शेतकरी पुरस्कारासाठी पात्र ठरला. अवकाळीचे जखमेने लाहीलाही झालेल्या बळीराजाचा ओठावर हास्य फुलविणारी ही घटना ठरली. अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुल तालुक्यातील प्रशांत मेश्राम हे पुरस्कारासाठी पात्र ठरले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मेश्राम यांच्या शेतीला भेट दिली.

निसर्गाचा असमतोलपणामुळे शेती भरवसाची उरली नाही. त्यात शेतपिकांवर येणारे विविध रोग शेतपिकांना मारक ठरत आहे. दरवर्षीच शेतीला मोठा फटका बसत असतो. पंधरा दिवसापुर्वी आलेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले. हाता तोडांशी आलेला घास हीरावला गेला. बळीराजा हतबला झाला. अशात जिल्ह्यातील मुल तालुक्यात येणाऱ्या मारोडा येथील सुशिक्षित युवा शेतकरी प्रशांत मेश्राम यांनी मात्र मोठी झेप घेतली आहे. राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कारासाठी मेश्राम पात्र ठरले आहे. जिल्हाचा सन्मानात भर घालणारी ही घटना आहेच सोबतच संकटाला खचून न जाता जिद्दीने उभे राहण्याचा संदेशही या युवा शेतकऱ्याने दिला.

पोलीस कर्मचाऱ्यांना धडकी! पुढचे २ महिने पगारातून कपात होणार ३५ ते ५० हजार रुपये
चंद्रपूर जिल्ह्यातील मारोडा हे छोटेसे गाव. गावातील प्रशांत मेश्राम यांनी शेतात विविध प्रयोग करीत प्रगती साधली.मेश्राम यांच्याकडे अवघी सहा एकर जागा आहे. या सहा एकरात सेंद्रिय खतांचा वापर करून ते पिके घेतात. सध्या शेतात भाजीपाला पिके उभी आहेत. टमाटर, वांगे, कारले, वालाचा शेंगा, मिरची शेतात बहरली आहे. तर दोन एकर जागेत खरबुजाची लागवड केली आहे. नगदी पिके असलेली, करडई, हरभरा, तूर, मका, धान पिकं मेश्राम घेत असतात.

केवळ शेतपिकावरच अवलंबून न राहता मेश्राम यांनी शेतीपुरक व्यवसाय उभे केले. शेतात शेळीपालन, मस्य पालन, कुकुटपालन, पशुपालन सूरू आहे. यातून बरीच मिळकत त्यांना होत असते. बारा महीणे शेतात विविध पिकांची लागवड करीत तो उत्पन्न घेत आहे. एकीकडे शेती भरवस्याची राहीली अशी ओरड होत असतांना प्रशांत मेश्राम यांनी घेतलेली झेप इतरांना प्रेरणादाई ठरली आहे.

पुढील ८ दिवसांत करोनाचा धोका वाढण्याची शक्यता, पालकमंत्र्यांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here