हायलाइट्स:
- सलमानने कुटुंबियांसह केली डाल बाटी चुरमाची पार्टी
- बीना काक यांच्या घरी झाली ही पार्टी
- बीना यांनी सोशल मीडियावर शेअर केला पार्टीचा फोटो
Video- एअरपोर्टवरचं श्रेयस तळपदेने म्हटला ‘पुष्पा’चा डायलॉग
बीना काक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या पार्टीचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सर्वजण डायनिंग टेबलवर बसून दाल बाटी चुरमा खाताना दिसत आहेत. एकीकडे सलमान खान, अरबाज खान आणि हेलन बसले आहेत तर दुसरीकडे अलविरा आणि वेशभूषाकार अॅश्ले रेबेलो दिसत आहे.

सलमान आणि बीना अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. सलमान बीना यांना आईच्या स्थानी मानतो. बीना काक यांनी काही सिनेमांत कामही केलं आहे. त्यामध्ये मैनें प्यार क्यों किया, गॉड तुस्सी ग्रेट हो या सिनेमात सलमानच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. बीना यांची मुलगी अमृता काक ही गायिका आहे. तिने सलमानच्या गॉड तुस्सी ग्रेट हो सिनेमात गाणी गायली आहेत. सलमान अमृताला बहीण मानतो. इतकेच नाही तर तिच्या लग्नातही सलमान सहभागी झाला होता.