मुंबई महानगपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी वॉर्डांची संख्या २२७ वरुन २३६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपला १०० हून जास्त नगरसेवक निवडून आणणे गरजेचे आहे. मुंबईतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद पाहता हे भाजपसाठी मोठे आव्हान असेल.

देवेंद्र राज

या निवडणुकीत अटीतटीची लढत झाल्यास सत्तास्थापनेसाठी ऐनवेळी मनसेची मदत घेता येईल, असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे.

हायलाइट्स:

  • मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आजपर्यंत अफाट काम केले आहे
  • गेल्या पाच ते सहा टर्मपासून मुंबईत शिवसेनेची सत्ता येत आहे
  • मुंबई महानगरपालिकेत कोणतीही छुपी युती झाली तरी शिवसेनेला त्याचा फरक पडत नाही

मुंबई : शिवसेनेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) युती होण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर याबाबत वाटाघाटी सुरु आहेत. भाजप-मनसेची ही युती छुप्या स्वरुपाची असेल, असे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने मुंबईतील कोणत्या जागा कोणासाठी सोडायच्या, याची चर्चा सुरु असल्याचे समजते. तसेच महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष युती होऊ शकली नाही तरी भाजप आणि मनसेमध्ये ‘सहकार्या’चा पॅटर्न आकाराला यावा, यादृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन या निवडणुकीत अटीतटीची लढत झाल्यास सत्तास्थापनेसाठी ऐनवेळी मनसेची मदत घेता येईल, असा मतप्रवाह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असल्याचे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिले आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींबाबत भाजप किंवा मनसेतील नेत्यांकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. (Speculation about भाजप आणि मनसे युती मध्ये बीएमसी निवडणूक २०२२)

मुंबई महानगपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी वॉर्डांची संख्या २२७ वरुन २३६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपला १०० हून जास्त नगरसेवक निवडून आणणे गरजेचे आहे. मुंबईतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद पाहता हे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. अशावेळी भाजपकडून मुंबईत कायमच बोलबाला असणाऱ्या मनसेची मदत घेतली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे अनेक प्रमुख नेते मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भेटले आहेत. मात्र, या भेटींमधून महानगरपालिका निवडणुकीसाठीची बोलणी पार पडली का, याविषयी निश्चित माहिती नाही. परंतु, आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिल्याने भाजप-मनसे युतीबाबातच्या हालचालींनी वेग येताना दिसत आहे.
भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली; नार्वेकर म्हणाले, यांना शिवबंधन बांधून टाका!
कोणत्याही छुप्या युतीचा आम्हाला फरक पडत नाही: अनिल देसाई

भाजप-मनसे युतीच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई महानगरपालिकेत कोणतीही छुपी युती झाली तरी शिवसेनेला त्याचा फरक पडत नाही, असे अनिल देसाई यांनी म्हटले. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आजपर्यंत अफाट काम केले आहे. गेल्या पाच ते सहा टर्मपासून मुंबईत शिवसेनेची सत्ता येत आहे. मुंबईकर हे सुज्ञ आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोणत्याची युतीचा फरक पडत नाही, असे अनिल देसाई यांनी म्हटले.

‘भाजप-मनसे युतीचा निर्णय राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच घेतील’

काही दिवसांपूर्वीच भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रसाद लाड यांना भाजप-मनसेच्या युतीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा प्रसाद लाड यांनी सूचक विधान केले होते. मनसे आणि भाजप यांनी युती करायची की नाही याचा निर्णय सर्वस्वी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अवलंबून असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: बीएमसी निवडणूक 2022 राज ठाकरे मनसे भाजपसोबत छुपी युती करू शकतात
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here