औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी ठरत आहे. तर औरंगाबाद शहरात रविवारी दिवसभरात तब्बल ७७९ रुग्ण आढळून आले असून,पॉझिटिव्हिटी रेट ४८.२७ वर पोहचला आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे.त्यामुळे आज होणाऱ्या टास्क फोर्सच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा सद्या कितीतरी पटीने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. औरंगाबाद मनपा हद्दीत १०० लोकांच्या तपासणीनंतर तब्बल ४९ लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. रविवारी दिवसभरात १,६१८ जणांची कोरोना चाचणी केली असता, त्यातील ७७९ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Zilla Parishad Election 2022 in Maharashtra: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार की नाही? राज्यात २६ झेडपी निवडणुकांवर संभ्रम
असा वाढला पॉझिटिव्हिटी रेट….
आठ दिवसांतील संसर्ग स्थिती

दिनांक तपासण्या बाधित पॉझिटिव्हिटी रेट

१५ जानेवारी २.३१३ ४२३ ८.४६

१६ जानेवारी २,५३९ ५१९ २०.५२

१७ जानेवारी ३,०९५ ३३० १०. ७६

१८ जानेवारी २,०६२ ७०१ ३४.२९

१९ जानेवारी २,३४६ ७६७ ३२.९९

२० जानेवारी २,३३५ ७३४ ३१.६१

२१ जानेवारी २,२६६ ७५८ ३३.८९

२२ जानेवारी २,१९७ ७९० ३६.००

२३ जानेवारी १,६१८ ७७९ ४८.२७

दिवसभरात १ हजार २२४ नवीन रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात एकूण १ हजार २२४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात मनपा हद्दीत ७७९ रुग्णांचा समावेश असून, ग्रामीण भागातील ४४५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण ५६७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून ७ हजार ५४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

School Reopen in Maharashtra 2022: आजपासून ‘या’ जिल्ह्यांत शाळा सुरू, करोनाच्या पार्श्वभूमिवर पालिकेचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here