औरंगाबाद न्यूज लाइव्ह: ‘…तर रावसाहेबांची ती इच्छा सुद्धा पूर्ण करू’; दानवेंच्या आव्हानाला सत्तारांनी स्वीकारलं – lets fulfill wish of raosaheb too the authorities accepted danve challenge
औरंगाबाद : दम असेल तर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभेत माझ्या विरोधात लढावे असे थेट आव्हान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांना दिला होता. तर दानवेंच्या याच आव्हानाला उत्तर देत, रावसाहेब दानवे यांची ही इच्छा सुद्धा पूर्ण करू असे म्हणत दानवे याचं आव्हान स्वीकारलं आहे.
पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, ‘खुद के गली मे तो कोई भी शेर होता है’, असा उल्लेख दानवे यांनी केल्याप्रमाणे मी आमच्या तालुक्यात शेर आहेच. परंतु शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर, मी लोकसभा लढवेल आणि दानवे यांची ही सुद्धा इच्छा पूर्ण करेल. तसेच माझ्या ऐवजी लोकसभेत इतर कोणालाही उमेदवारी दिली तरीही, त्याला निवडून आणायचंच अशी संकल्पना आम्ही केली आहे, असेही सत्तार म्हणाले. त्यामुळे आगामी काळात राजकारणातील कट्टर शत्रू असलेले रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय कुस्ती पहायला मिळणार अशी चर्चा पाहायला मिळत आहे. Coronavirus Aurangabad: ‘या’ शहराची चिंता वाढली; १०० नागरिकांच्या तपासणीनंतर ४९ जणांना करोनाची लागण काय म्हणाले होते दानवे…..
औरंगाबादच्या पिंप्रीराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा मोर्चा भाकरी घरच्या डब्बा पार्टी कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, सत्तार म्हणतात मी सिल्लोडमधून लढावे,पण ‘खुद के गली मे तो कोई भी शेर होता है’, पण जर लढायचं असेल तर होऊन जाऊ द्यावं लोकसभेला, असेल दम त्यांच्यांत तर यावे त्यांनी लोकसभेला, होऊन जाऊ देऊ लोकसभेला,असे थेट आव्हान दानवे यांनी सत्तार यांना दिले होते.