हिंगोली : मागिल काही महिन्यांपासून माघारी परतलेल्या करोनाने पुन्हा एकदा हिंगोली राज्य राखीव पोलीस दलात शिरकाव केला आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलात पुन्हा एकदा करोनाने एन्ट्री केली आहे. यवतमाळच्या पुसद शहरात कर्तव्य बजावून परतलेल्या ५७ जवानांना करोनाची लागण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिंगोली राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपी) हे जवान बंदोबस्त कामी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, यातील अनेक जवानांना करोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने राज्य राखीव पोलीस दलाने बंदोबस्त करुन माघारी परतलेल्या या १६९ जवानांची करोना टेस्ट केली. ज्यात तब्बल ५७ जवान बाधित आल्याची माहिती हिंगोलीच्या आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

महिलांच्या अश्लील ‘न्यूड डान्स’ प्रकरणी मोठी कारवाई, १० आयोजक आणि ३ नृत्यांगना पोलिसांच्या रडारवर
दरम्यान, या जवानांना सध्या हिंगोलीच्या शासकीय विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून राज्य राखीव पोलीस दलातून हद्दपार झालेल्या करोनाने पुन्हा एकदा शिरकाव केल्याने जवानांच्या कुटुंबीयांसह सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. आज घडीला हिंगोली जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा ८५५ वर पोहचला आहे. नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.

School Reopen in Maharashtra 2022: आजपासून ‘या’ जिल्ह्यांत शाळा सुरू, करोनाच्या पार्श्वभूमिवर पालिकेचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here