हायलाइट्स:

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
  • जर्मनीत नेताजींची काही दुर्मिळ पत्रं प्रदर्शित
  • भारतात पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रतिमेचं अनावरण

बर्लिन, जर्मनी :

२३ जानेवारी… नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती… भारतासहीत जर्मनीतही नेताजींच्या जयंती निमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. नेताजींच्या जयंतीनिमित्त जर्मनीत एका प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात नेताजींशी संबंधित काही दुर्मिळ वैयक्तिक पत्रं आणि कलाकृतींचाही समावेश आहे.

जर्मनीतील भारतीय दूतावासाच्या आवारात हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रदर्शनाचं उद्घाटन भारताचे राजदूत हरीश पी आणि नेताजींच्या कन्या डॉक्टर. अनिता बोस यांच्या हस्ते पार पडलं.


Nightclub Fire: ‘नाईटक्लब’मध्ये भीषण आग, १६ जण जिवंत होरपळले
Watch Video: उंचावरून गिर्यारोहकांवर कोसळला पर्वताचा कडा! थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
नेताजीचा जर्मनीला भेट

भारताला स्वतंत्र करण्याच्या लढाईत जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरकडून सहकार्य मिळवण्यासाठी नेताजी जर्मनीला दाखल झाले होते. या दौऱ्यात त्यांची हिटलरशी भेटही झाली. उल्लेखनीय म्हणजे, नेताजी आणि हिटलर या दोन व्यक्तीमत्त्वांची विचारधारा भिन्न होती. दुसऱ्या महायुद्धात एकीकडे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन हे मित्र राष्ट्र होते तर दुसऱ्या बाजूला जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांचा समावेश होता. यामुळेच नेताजींनी हिटलरकडे मदत मागितली होती. १९३३ साली हिटलरनं नेताजींना भेट नाकारली मात्र १९४० मध्ये ही भेट झाली.

भारतात नेताजींची जयंती साजरी
भारतातही जयंतीनिमित्त ‘इंडिया गेट’वर नेताजींचा एका प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याच अनावरण पार पडलं. इंडिया गेटवर जॉर्ज पंचम यांची प्रतिमा असलेल्या जागेवरच नेताजींची ही प्रतिमा उभारण्यात आलीय.

जागोजागी जॉर्ज पंचमचा पुतळा बसवला

अभिलेखीय दस्तऐवजानुसार, १९३९ मध्ये इंडिया गेटजवळ किंग जॉर्ज पंचम यांच्या एका भव्य संगमरवरी पुतळ्याचे अनावरण तत्कालीन व्हाईसरॉयच्या हस्ते करण्यात आलं होतं. ज्यांच्या कारकिर्दीत देशाची नवी राजधानी ‘नवी दिल्ली’ बांधण्यात आली त्या ‘ब्रिटिश सम्राटाचं स्मारक’ म्हणून हे स्मारक प्रसिद्ध होतं. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात किंग जॉर्ज (पाचवे) आणि राजा एडवर्ड (सातवे) यांचे पुतळे वायव्य दिल्लीतील १९११ च्या शाही दरबाराच्या जागेवर हलवण्यात आले होते. हेच ठिकाण आता ‘कोरोनेशन पार्क’ म्हणून ओळखलं जातं.

Omicron Variant: ‘ओमिक्रॉन’चाही उपप्रकार बीए२ जन्मला! युरोपसहीत भारतातही धास्तीVIDEO: ‘बजरंगी भाईजान’ फेम रिपोर्टर चाँद नवाब यांचं धम्माल रिपोर्टिंग चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here