Live अपडेट्स…
>> दिल्ली: निजामुद्दीन भागातून आजही लोकांना तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे.
>> देशभरात आतापर्यंत १२९९ रुग्णाची नोंद. मृतांची संख्या ३६ वर.
>> महाराष्ट्रात आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू.
>> कर्नाटकात आणखी ३ नवे रुग्ण.. रुग्णांची एकूण संख्या ९१ वर.
>> नोएडा: तीन महिन्यांची सुट्टी मागणारे जिल्हाधिकारी बी. एन. सिंह यांची बदली. त्यांना लखनऊ येथील महसूल विभागात पाठवण्यात आले आहे.
>> दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात १७४ करोनाच्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. यात १६३ निजामुद्दीन येथील आहेत.
>> दिल्ली सरकारने पोलिसांना निजामुद्दीन मरकजच्या मौलानांविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या केल्या सूचना.
>> कर्नाटक: रात्री १० वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत म्हणजेच झोपण्याच्या वेळेत हे लागू होणार नाही- डॉ. के. सुधाकर, कर्नाटकचे मंत्री.
>> कर्नाटकात होम क्वारंटाइन असलेल्या लोकांना दर तासाला सरकारला आपली सेल्फी पाठवायची आहे. त्याने सेल्फी पाठवली नाही, तर अशा लोकांना सरकारी क्वारंटाइनमध्ये पाठवले जाणार आहे- डॉ. के. सुधाकर, कर्नाटकचे मंत्री.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times