हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरे यांनी साधला भाजपवर निशाणा
  • संजय राऊत यांनी युतीत सडल्याच्या वक्तव्याचे केले समर्थन
  • राऊत यांनी सांगितली शिवसेना लाटेची गोष्ट
  • देशात शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता- राऊत

मुंबई: २५ वर्षे भाजपसोबत युतीत सडली, या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले. बाबरी प्रकरणानंतर देशात शिवसेनेची, बाळासाहेबांची लाट होती, त्यावेळी शिवसेनेने निवडणूक लढवली असती तर, आज देशाचा पंतप्रधान शिवसेनेचा झाला असता, असं राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपसोबतच्या युतीत २५ वर्षे आपली सडली, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याचाच संदर्भ देत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांची ती प्रतिक्रिया प्रखर होती. त्यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आणि त्या योग्य आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.

cm thackeray interacts with shiv sainiks: ‘गद्दारी करण्यापेक्षा बिनधास्त शिवसेना सोडा’; मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपटले कान!
मुख्यमंत्री लवकरच सक्रिय;विरोधकांकडून होणाऱ्या टीकेस आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी आधीही सांगितले आहे की भाजपसोबत युतीत २५ वर्षे सडली. भाजपला जमिनीवरून आकाशापर्यंत पोहोचवले. शिवसेनेने आघाडीचा धर्म निभावला. इतिहास साक्षीदार आहे. उद्धव यांनी त्यांच्या मनातील वेदना व्यक्त केल्या. त्या योग्य आहेत. जो चांगल्या हेतूने भाजपसोबत गेला, त्या सर्व पक्षांचे तसेच हाल झाले आहेत. भाजपसोबत गेल्याची किंमत सर्वांना चुकवावी लागली आहे. शिवसेना एकटा असा पक्ष आहे, ज्याने भाजपलाच त्यांच्या कृतीची किंमत मोजायला लावली, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

बाळासाहेबांचे मन विशाल होते…

यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. बाबरी प्रकरणानंतर देशात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची लाट होती. त्यावेळी उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, पंजाब आणि अगदी जम्मूमध्ये निवडणुका लढवल्या असत्या तर, उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे देशात आज शिवसेनेचा पंतप्रधान असता. मात्र, भाजपसाठी शिवसेनेने ते सोडले. भाजपला देशात विस्तार करू द्या. आम्ही महाराष्ट्रात काम करू, असे त्यावेळी बाळासाहेबांचे म्हणणे होते. बाळासाहेबांचे मन विशाल होते. तुम्ही आणि आम्ही एकाच विचारधारेचे आहोत, असे बाळासाहेबांचे विचार होते, असे राऊत यांनी सांगितले.

सव्वा लाख मुंबईकरांनी केल्या घरी चाचण्या

भाजपचे हिंदुत्व ढोंगी – राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. फक्त सत्तेपुरते आहे, वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची नीती आहे, असं राऊत म्हणाले. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा भाजपची चिलखत आहेत. चिलखती घालून भाजप राजकीय शत्रूंशी लढत आहे. हिंमत असेल तर, ही चिलखतं काढून या, गाडून टाकू या ठाकरेंच्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत आहोत. आम्ही झुकणार नाही. शिवसेनेची पावले आता दिल्लीच्या दिशेने पडत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

dust storm : पाकिस्तानच्या वादळाचा परिणाम; मुंबई, पुणे, कोकणात धुळीचे साम्राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here