हायलाइट्स:

  • मुंबईतील इमारत आग दुर्घटना
  • आणखी एका जखमी तरुणाचा मृत्यू
  • आगीतील मृतांचा आकडा सातवर पोहोचला
  • विविध रुग्णालयांत १६ रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई: मुंबईतील ताडदेव येथील २० मजली इमारतीला शनिवारी लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला होता. आज, सोमवारी मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. एका ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मनीष सिंह असे या तरुणाचे नाव आहे.

मुंबईतील ताडदेव येथील २० मजली इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला होता. तर या आगीत २० हून अधिक जण जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींना रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी एका जखमी तरूणाचा सोमवारी मृत्यू झाला. मनीष सिंह या ३८ वर्षीय तरुणावर उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. अद्याप १६ रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे.

अग्निसुरक्षेतील त्रुटी रोखणार;दोष निवीरणाचे अग्निशमन दलाला आव्हान
अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष;शहरातील अनेक इमारतींमध्ये सुरक्षेचा अभाव

महापालिका अधिकाऱ्याने डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितले की, नायर रुग्णालयात दाखल ३८ वर्षीय तरुणाचा सकाळी सात वाजता मृत्यू झाला. भाटिया रुग्णालयात १२ अन्य जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असून, उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, भायखळ्याच्या रुग्णालयात दाखल अन्य एका जखमी रुग्णाची प्रकृती गंभीर आहे.

Mumbai Tardeo Fire: आगीत होरपळलेल्या रुग्णांवर उपचार करायला नकार; मुंबईतील ‘या’ तीन रुग्णालयांवर कठोर कारवाईची शक्यता

गेल्या वर्षभरात ५ मोठ्या दुर्घटना

मुंबई शहरात एकीकडे गगनचुंबी इमारती आणि दुसरीकडे लाखोंच्या संख्येने झोपड्याही आहेत. या झोपडपट्टी परिसरात एखादवेळी आगीची घटना घडली तर, अग्निशमन दलाला तिथे पोहोचण्यासाठी मोठे अडथळे पार करावे लागतात. तर काही इमारतींमध्ये आग लागल्यास तिथं पोहोचण्यासाठीही विविध समस्या येत आहेत, अशी परिस्थिती आहे. मुंबई आणि राज्यातील विविध भागांत नेहमीच आगीच्या घटना घडत असतात. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेक इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट झाले नसल्याची बाब चौकशीनंतर समोर येत आहे. तर काही इमारतींमधील आग नियंत्रण उपकरणे निकामी असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी तर, अवैधपणे इमारती उभ्या केल्या जात असल्याचीही बाब समोर आली आहे. मुंबई किंवा राज्यात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक ठिकाणी आगी लागल्या आहेत आणि यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यात कमला इमारत आग दुर्घटना, भांडुप रुग्णालय, भंडारा येथील सरकारी रुग्णालय, लालबागमधील इमारत दुर्घटना आणि पुण्यातील प्लास्टिकच्या कारखान्याला लागलेली आग या दुर्घटनांचा समावेश आहे.

मुंबईतील ताडदेवमध्ये २० मजली इमारतीला आग, १० जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here