हायलाइट्स:

  • लंडनच्या सोलिहूल भागातील घटना
  • नऊ वर्षांपासून अपंग महिलेला घराबाहेर पडणंही कठिण
  • कंपनीला धडा शिकवण्यासाठी ‘क्राउडफंडिंग कॅम्पेन’ सुरू

लंडन, यूके:

आपल्या घराची देखभाल करणाऱ्या कंपनीची एक छोटीशी चूक ५८ वर्षीय डॉन स्टील यांना भारी पडलीय. गेल्या नऊ वर्षांपासून त्या आपल्याच घरात कोंडून पडल्यात.

५८ वर्षीय डॉन स्टील यांना २०१३ साली गुडघ्याची शस्रक्रियेला सामोरं जावं लागलं. तेव्हापासून त्यांना व्हिलचेअरचाच आधार घ्यावा लागतोय. बर्मिंगहॅम हून सोलिहूलच्या आपल्या घरात स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांनी व्हिलचेअरचा वापर सुरू केला. मात्र तेव्हापासून त्या आपल्या घरातून बाहेर पडू शकलेल्या नाहीत.

याचं कारण म्हणजे, डॉन यांच्या घराची देखभाल करणाऱ्या कंपनीनं या घराबाहेर रॅम्पचं उभारलेला नाही. या प्रकरणावरून डॉन आणि त्यांच्या मालमत्तेची देखभाल करणाऱ्या कंपनीमध्ये वाद सुरू आहे. डॉन आता कंपनीविरुद्ध दावा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

यामुळेच, सामान खरेदीसाठी होम डिलिव्हरी सुविधा आणि रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका सुविधेवर डॉन यांना अवलंबून राहावं लागतंय.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच… पाकिस्तानातून हवाईमार्गानं भारतात दाखल होणार पर्यटक!
जर्मनीत सुभाषचंद्र बोस यांच्या आठवणींना उजाळा, दुर्मिळ पत्रंही प्रदर्शित
डॉन यांनी कंपनीला आपल्या घराबाहेर व्हिलचेअर रॅम्प तयार करण्यास सांगितलं होतं. या रॅम्पच्या सहाय्यानं त्या कुणाच्या मदतीशिवाय व्हिलचेअरवरून स्वत:च घराबाहेर पडता आलं असतं. इमारतीची देखभाल करणाऱ्या कंपनीला त्या दरवर्षी २००० पौंड मोजतात. मात्र, कंपनीनं बांधकामात दिरंगाई केल्याचा आरोप डॉन यांनी केला आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आणि रॅम्प न उभारला गेल्यानं आता त्यांच्यावर २४ तास घरातच कोंडून राहण्याची वेळ आलीय.

‘माझ्याच घरात मला एकटेपणा जाणवतोय. कोविडमुळे लोकांना एक किंवा दोन महिने घरात राहावं लागलं तर ते याची तक्रार करतात. परंतु, मला एकाच घरात कुणालाही न पाहता तब्बल नऊ वर्षांपासून राहावं लागतंय’ असं डॉन स्टील यांनी आपल्या परिस्थितीला वैतागून म्हटलंय. आता आपल्या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या कंपनीविरुद्ध दावा ठोकून त्यांना चांगलीच अद्दल घडवण्याचा विचारही डॉन यांनी पक्का केलाय.

मात्र, न्यायालयाची पायरी चढण्यासाठी आणि वकिलाच्या फीसाठी त्यांना पैशांची गरज भासणार आहे. यासाठी त्यांनी एक ‘क्राउडफंडिंग कॅम्पेन‘ही सुरू केलंय. या माध्यमातून आपण १५०० पाउंड गोळा करू शकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Nightclub Fire: ‘नाईटक्लब’मध्ये भीषण आग, १६ जण जिवंत होरपळले
VIDEO: ‘बजरंगी भाईजान’ फेम रिपोर्टर चाँद नवाब यांचं धम्माल रिपोर्टिंग चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here