औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या खाजगीकरणाच्या विरोधात मनसेकडून मंगळवारी रंगमंदिराच्या बाहेर निदर्शने करण्यात आले. या यावेळी काळ्या फिती लावून महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत, रंगमंदिराचे नुतणीकरण करण्यासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च करूनही खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केला आहे.
तसेच एकनाथ रंगमंदिराच खाजगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. त्यामुळे जर महानगरपालिका रंगमंदिर चालू शकत नसतील तर आयुक्त यांनी खुर्ची खाली करावी अशी मागणी खांबेकर यांनी यावेळी केली. त्यामुळे अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो असून, खाजगीकरणाला आमचा विरोधच राहणार असल्याचं ही या यावेळी खांबेकर यांनी म्हटलं आहे.