हायलाइट्स:

  • मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे
  • उमेदवार निवडीपासून अगदी प्रचाराच्या रणनीतीपर्यंत सर्वकाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे सक्रिय होताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सध्या मुंबईत शिवसेनेकडून विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा धडाका सुरु आहे. आदित्य ठाकरे (आदित्य ठाकरे) हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात फिरकतच नाहीत, अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील त्यांच्या प्रचारमोहिमेचा श्रीगणेशा वरळी विधानसभा मतदारसंघातूनच केला आहे. आदित्य ठाकरे सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वरळी मतदारसंघात फिरताना आढळून आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वरळीतील एका मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. आदित्य ठाकरे यांनी पहिल्याच चेंडूवर सिक्सर ठोकत उपस्थितांची वाहवा मिळवली.
विरोधक सतत टीका करतात, पण त्यांचा फोकस माझ्यावर, याचं मला बरं वाटतं : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी रविवारीही वरळीत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले होते. यानिमित्ताने शिवसेनेने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी वातावरण तापवायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. उमेदवार निवडीपासून अगदी प्रचाराच्या रणनीतीपर्यंत सर्वकाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. मात्र, भाजपचे कडवे आव्हान पाहता ही निवडणूक आदित्य ठाकरे यांच्यासाठी निश्चितच सोपी नसेल. त्यामुळेच आदित्य ठाकरे आतापासूनच कंबर कसून कामाला लागले आहेत.
Balasaheb Thackeray birth anniversary: आदित्य ठाकरेंकडून आजोबांसोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा

विरोधकांचा फोकस माझ्यावर आहे, हे पाहून बरं वाटतं: आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले होते. कितीही काम केलं तरी विरोधक टीका करतातच. त्यांना काही दिसतंच नाही. तरीही विरोधकांचं माझ्यावर लक्ष आहे, हे पाहून बरं वाटतं, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच सक्रिय होतील, असेही आदित्य यांनी म्हटले होते. विरोधक आरोप-प्रत्यारोप करुन मुख्यमंत्र्यांची प्रतिम मलीन करण्याचा प्रयत्न करु पाहत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. विरोधक जनतेला भरकटवत असतात. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनार्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्यासोबत ठाम उभा असल्याचे आदित्य यांनी सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here