हायलाइट्स:

  • अमोल कोल्हे यांनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका
  • ‘या’ चित्रपटाविरोधात काँग्रेसची आक्रमक भूमिका
  • महाराष्ट्रातील चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित करून देऊ नका
  • काँग्रेसची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

मुंबई: अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हाय आय किल्ड गांधी‘ (Why I killed Gandhi) या चित्रपटावर बंदीची मागणी होत आहे. महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनास प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंबंधीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात नथुराम गोडसे याची भूमिका साकारली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे. मात्र, हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, यावरून अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका होत आहे. या सिनेमाविरोधात काँग्रेसही मैदानात उतरला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसची आहे. आमची ही मागणी मान्य करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही मागणी केली आहे.

Amol Kolhe : नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून वाद; नाना पटोले म्हणाले, अमोल कोल्हेंनी…
Sharad Pawar – Amol Kolhe :’नथुराम’ वादावरून राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या भाजपला शरद पवारांनी सुनावले!

काय म्हटलं आहे या निवेदनात?

नथुराम गोडसे याने १९४८ मध्ये महात्मा गांधीजींची हत्या केली. कडव्या विचारांचे निर्माता आता यावर्षी ३० जानेवारीलाच गांधीजींच्या हत्येचे समर्थन करणारा चित्रपट प्रदर्शित करू पाहत आहेत. महात्मा गांधींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या देशाची ओळख गांधींजींच्या नावाने होत आहे. सत्य, अहिंसा, सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यातून दाखवून दिले. म्हणूनच संपूर्ण जगभर ते परम पुज्यनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून पाळला जात असताना दुसरीकडे अशांतता, द्वेष आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Amol Kolhe: अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत; राष्ट्रवादीने मांडली स्पष्ट भूमिका

कोणत्याही घृणास्पद व अमानवीय कृत्याचे उदात्तीकरण हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. म्हणून हा चित्रपट राज्यात कोणत्याही चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्याची काँग्रेसची मागणी आहे. ती मान्य करण्यात यावी, असेही पटोले यांनी निवेदनात म्हटले आहे.

“कलाकार म्हणून अमोल कोल्हेंच्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे”; शरद पवारांनी केली पाठराखण

अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत; निर्णयावर अनेकांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here