हायलाइट्स:

  • कल्याणमधील गौरीपाडा तलावात कासवांचा मृत्यू
  • १०० हून अधिक कासव मृत
  • केडीएमसी, वनविभागासह तज्ज्ञांकडून विविध शक्यता व्यक्त
  • नेमके कारण अद्याप अस्पष्ट

कल्याण: कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा तलावात जवळपास ८५ कासव मृतावस्थेत आढळून आले आहेत. शनिवापासून आतापर्यंत १३५ कासवांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कासवांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत.

कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा येथे मोठा तलाव आहे. याच तलावाचे काही वर्षांपूर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. मात्र दोन दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने कासव मृतावस्थेत आढळून आले. ही माहिती स्थानिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळास दिली.

काही कासव तलावाच्या बाजूला असलेल्या गवातात आढळून आले. तलावात मासेमारी करताना माशांना काही खायला टाकण्यात आले असावे. तेच खाद्य कासवांनीही खाल्ले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावाच्या पाण्यात काही मिसळले गेले असल्याने, प्रदूषित पाण्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक! किडनी विकून ४ कोटी मिळवून देण्याचे आमिष, ‘त्या’ नेपाळी गायिकेनं केलं भलतंच…

कल्याणनजीकच्या गावातील नागरिकांचा जीव धोक्यात, नदीवरील धोकादायक पुलामुळे जीव टांगणीला

या घटनेची माहिती मिळताच, वनविभाग आणि केडीएमची अधिकारी तसेच डब्ल्यूएआरआर या स्वयंसेवी संस्थेचे पथक बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काही कासवांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी सुरक्षित ठिकाणी ठेवले. रविवारी पाच कासवांना वाचवण्यात आले. आतापर्यंत ११ कासवांना वाचवण्यात यश आले आहे. तर सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या दोन कासवांचा मृत्यू झाला. ते संजय गांधी नॅशनल पार्कात पाठण्यात आले आहेत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण लवकरच कळेल, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

मृत्यू समोर दिसत असतानाही सोडली नाही पतीची साथ…

केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्यातील नमुने गोळा केले आहेत. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नदीचे प्रदूषित पाणी किंवा एखादा विषारी पदार्थ त्यात मिसळण्यात आला आहे का, याचा शोध घेण्यात येणार आहे. सांडपाणी थेट तलावात येत असल्यामुळे प्रदूषणामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर, एखादा आजार किंवा विषारी पदार्थ पाण्यात मिसळल्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. वनविभागाने याची चौकशी सुरू केली असून, कासवांच्या मृत्यूमागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here