हायलाइट्स:

  • वामिकाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विराट अनुषकाने शेअर केली पोस्ट
  • कॅमेरामन व्हिडिओ करत असल्याची कल्पना नव्हती
  • वामिकाचे फोटो छापण्यासंदर्भात प्रसार माध्यमांना केली पुन्हा विनंती

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामान्यावेळी विराट आणि अनुष्का यांच्या मुलीचा, वामिका दाखवण्यात आली. अनुष्का आणि वामिकाचा हा व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाले. रविवारी दिवसभर विराट- अनुष्काच्या लेकीचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. या सगळ्यात अनुष्का आणि विराटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचं यावरचं मत मांडलं आहे.

Video- मेकअप करताना साराच्या चेहऱ्याजवळ फुटला बल्ब

काय आहे विराट अनुष्काची पोस्ट

वामिकाचा जन्म झाल्यापासून विराट आणि अनुष्काने तिचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. जोपर्यंत वामिकाला सोशल मीडियाची समज येत नाही तोपर्यंत तिचा एकही फोटो शेअर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तसेच फोटोग्राफर्स आणि मीडियाला देखील त्यांनी तसं आवाहन केलं होतं. त्यामुळे वामिकाचा जन्म होऊन वर्ष उलटलं तरी तिचा एकही फोटो शेअर झाला नव्हता. जे काही तिचे फोटो शेअर झाले होते, त्यात तिचा चेहरा दिसत नव्हता. परंतू भारत आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी अनुष्काच्या कडेवर असलेल्या वामिकाचा व्हिडिओ कॅमेरामनने टिपला.

अनुष्का आणि वामिका

त्यानंतर क्षणार्धात वामिका आणि अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या सगळ्या घडामोडींबद्दल विराट आणि अनुष्काने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, ‘काल आमच्या मुलीचा वामिकाचा फोटो काढण्यात आला आणि तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. आम्हाला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की कॅमेरामन आमचं व्हिडिओ शूट करत होता याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती.’

‘पुष्पा’साठी अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने किती घेतलेलं मानधन

‘दरम्यान, वामिकाचे फोटो शेअर करण्याबाबत जे मत आम्ही आधी व्यक्त केले आहे, ते आजही तेच आहे. त्यामुळे कृपा करून वामिकाचे फोटो काढू नका आणि ते छापू नका.’ विराट आणि अनुष्काच्या मुलीचा वामिकाचा जन्म ११ जानेवारी २०२१ रोजी झाला. वामिकाच्या जन्मानंतर तिचे खासगीपण जपण्याचा हे दोघे प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here