हायलाइट्स:
- फोंडा घाटात टँकरचालकाचा खून
- जीपीएस सिस्टीमद्वारे कळालं टँकरचं लोकेशन
- सीसीटीव्ही फुटेजमधून होणार आरोपींचा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी फोंडा राज्यमार्ग नं-१७८ वर शेळप बांबर दरम्यान टँकर चालक तरलोकसिंग धरमसिंग याने रस्त्याच्या बाजुला टँकर लावल्याचं जीपीआरएस सिस्टीमद्वारे टँकर मालकाला समजले. त्यानुसार चौकशी केली असता थांबलेल्या टँकरमध्ये चालकाचा केबिनमध्ये खून केल्याचं निदर्शनास आले. त्याच्या डोक्यावर आणि कानाच्या पाठीमागे वार झाल्याचे दिसून आले. कोणीतरी अज्ञातांनी दोन दिवसापूर्वी हा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.
याबाबत राधानगरी येथील एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असं राधानगरी पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी अधिक तपास राधानगरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी, उपनिरीक्षक नजीरखान, सुरेश मेटील, कृष्णात यादव आदी करत आहेत.