मुंबई: करोना व्हायरसच्या उद्रेकानंतर महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना, कामगार व मजुरांना सर्वतोपरी मदत देण्याचं काम राज्य सरकार करत आहे. राज्य सरकारच्या या कामाबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

‘करोना’ची साथ पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळं हातावर पोट असलेल्या मुंबईतील हजारो मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपापल्या राज्यात जाण्यासाठी या नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अशा परिस्थितीत प्रवास करणे धोकादायक असल्यानं राज्य सरकारनं त्यांना इथंच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्यासाठी शेकडो निवारा केंद्रांची सोय केली असून त्यांना जेवणही पुरवले जात आहे. आणखीही काही कामगारांपर्यंत पोहोचण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

वाचा:

झारखंडमधील कुटुंबांना मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. झारखंडच्या गरजू नागरिकांना अशीच मदत सुरू ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही सोरेन यांच्या या ट्विटला तात्काळ प्रतिसाद दिला. ‘तुम्ही निश्चिंत राहा. झारखंडमधील आमच्या बांधवांना आम्ही अवश्य मदत देऊ. ते आमचं कर्तव्यच आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या भूमिकेचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

वाचा: ‘

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here