हायलाइट्स:
- राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांकडून राडा
- जिल्हा परिषद अध्यक्षांच्या घरात केली तोडफोड
- सात ते आठ जणांविरोधात फिर्याद दाखल
फिर्यादी राजू कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे हे सात ते आठ जणांसह जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या घरात घुसले. दारूच्या नशेतील कचरे यांच्यासह इतरांनी प्राजक्ता कोरे यांच्या नातेवाईकांना धक्काबुक्की सुरू केली. तसंच घरातील कुंड्या आणि फर्निचरची तोडफोड केली.
अचानक घडलेल्या घटनेमुळे कोरे यांच्या घरातील नातेवाईक घाबरले. प्राजक्ता कोरे घराच्या पाठीमागील दारातून बाहेर पडल्या. यावेळी संभाजी कचरे हे कोरे कुटुंबीयांना धमकावून बाहेर पडले. त्यानंतर अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे दीर राजू कोरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन कचरे यांच्यासह सात ते आठ जणांच्या विरोधात फिर्याद दिली.
दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे सांगलीतील भाजप आणि राष्ट्रवादीमधील राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.