Wardha Accidental Death Of 7 Students Who Went For Birthday Celebration | वर्ध्यात भीषण अपघात; बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, भाजप आमदार पुत्राचाही समावेश | Maharashtra Times
वर्धा : वर्धा जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा इथे एक भीषण अपघात झाला आहे. चारचाकी एक्सयूवी वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये ७ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी येथून वर्धाला येत असताना सेलसुरा जवळ हा अपघात झाला. वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे जवळील नदीच्या पुलावरून वाहने थेट खाली पडलं. जवळपास ४० फूट लांब व रुंद चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये भंडारा जिल्ह्याचे आमदार विजय रहांगदळे यांचा मुलगा असल्याची माहिती आहे. औरंगाबादकरांना दिलासा, ५ दिवसांनंतर करोनासंबंधी आली मोठी बातमी गंभीर म्हणजे मृतांमध्ये सर्वच जवळपास २५ ते ३५ वयोगटातील आहेत. रात्री एक वाजताच्या जवळपास हा अपघात झाला. चार वाजेपर्यंत मृत्यूदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही इतर मृतदेहांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
या दरम्यान घटनास्थळी वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षक हे उपस्थित होते. सर्व मृतक हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. मृतदेह वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत तर या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.