हायलाइट्स:
- श्रीवर्धनजवळ जीवना बंदर येथील नौकेला जलसमाधी
- चार खलाशी बालंबाल बचावले
- नौका आणि जाळे असे एकूण १२ ते १४ लाखांचे नुकसान
- नुकसान भरपाई देण्याची मच्छिमारांची मागणी
२३ जानेवारी रविवारी दुपारनतंर श्रीवर्धन येथील समुद्रामध्ये सोसाट्याचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे मच्छिमार हे भयभीत होऊन आपापल्या नौका मुळगाव येथील खाडीमध्ये सुरक्षित ठिकाणी नेत होते. वाऱ्याचा प्रचंड वेग आणि समुद्राने धारण केलेल्या रौद्ररूपामुळे मच्छिमार बांधवही हतबल झाले होते. त्यामध्येच अनिकेत, लक्ष्मण रघुवीर यांच्या लक्ष्मी विजय नौकेचे सुकान तुटल्याने नौका भरकटली व दगडावर आदळल्याने नौकेला दांडा तरीबंदर टोकाजवळ जलसमाधी मिळाली. त्या नौकेमधील बाळकृष्ण रघुवीर, जयेश रघुवीर, गणेश कुलाबकर यांनी मृत्यूशी सामना करत स्वतःचा जीव वाचवला. मात्र लक्ष्मी विजय नौकेला जलसमाधी मिळाली. नौका आणि जाळे असे एकूण १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. सरकारने नुकसानग्रस्त मच्छिमारांना मदत जाहीर करावी, अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमारांकडून केली जात आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी 50-60 तरुण मागे पळाले खरे, पण
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही वादळामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. दररोज लागणारा डिझेल, बर्फ, तेल, रेशनिंग आदींसाठीचा खर्चही निघत नाही. मच्छिमारांना पुरेसे मासेही मिळत नाहीत. त्यामुळे मच्छिमार आधीच संकटात सापडलेला असताना समुद्रातील वादळांमुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.