हायलाइट्स:
- संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या उपकारांची जाणीव करुन दिली
- बाळासाहेबांनी हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी मोठ्या मनाने भाजपशी युती केली
यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या उपकारांची जाणीव करुन दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी उघडपणे पुरस्कार केला होता. हिंदुत्व वाढेल, या मुद्द्यावर एकत्र निवडणुका लढू शकतो, असा प्रस्ताव भाजप नेत्यांनी त्यांच्यासमोर ठेवला. यामध्ये प्रमोद महाजन आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश होता. तेव्हा बाळासाहेबांनी हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी मोठ्या मनाने भाजपशी युती केली. मात्र, भाजपच्या नवहिंदुत्वावादी नेत्यांना याचा विसर पडला आहे. त्यांच्याकडे इतिहासाची फाडलेली पाने नाहीत. त्यामुळे त्यांना हा सगळा इतिहास अवगत नाही. परंतु, आम्ही भाजपच्या नव्या नेत्यांना वेळोवेळी याची आठवण करुन देऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पुनम महाजन काय म्हणाल्या होत्या?
संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढण्यासाठी एक जुने व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, हे व्यंगचित्र पाहून प्रमोद महाजन (Poonam Mahajan) यांची कन्या पुनम महाजन यांचा संताप अनावर झाला आहे. पुनम महाजन यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना अत्यंत तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, अशी जळजळीत टीका पुनम महाजन केली होती.