उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण या गावातील सुभाष माकोडे युवा शेतकरी टोमॅटोच्या उत्पन्नामुळे करोडपती झाला आहे. लॉकडाऊनमुळे औषध दुकान डबघाईला आले. मग शेतात जम बसतोय का म्हणून पहिल्यांदा प्रयत्न केला आणि यातच त्यांनी यशाची मोठी मजल मारली आहे. त्यांच्या या यशामुळे सर्वच स्तरातून त्यांचं कौतूक करण्यात येत आहे.

खरंतर, मार्चच्या पहिल्या लाँकडाऊनमध्ये आर्यमान जातीच्या टोमॅटोची लागवड केली. एकरी साडेपाच हजार रोप लावली एकूण बारा एकरमध्ये ७२ हजार रोपे लावली. लॉकडाऊन असल्यामुळे व्यापारी आले नाहीत परंतु केलेला खर्च निघाला. टोमॅटो आपल्याला तारेल म्हणून पुन्हा बारा एकरावर आर्यमान जातीच्या टोमॅटोची लागवड केली. ७२ हजार रोपांना मल्चिंग पेपर टाकून लागवड केली.

Wardha Accident : वर्ध्यात भाजप आमदाराच्या मुलासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाहा अपघातानंतरचा पहिला VIDEO
योग्य नियोजन कष्ट चिकाटी याच्या जोरावर सुभाष माकोडे यांनी चार महिन्यात १ कोटीचे उत्पन्न घेतले. यासाठी २०/२२ लाख रुपये त्यांनी खर्च केला तर निव्वळ नफा ८० लाख रुपये झाला आहे. व्यापार पेठांची माहिती घेवून बैंगलोर, अहमदाबाद, सुरत मुंबई, गुलबर्गा, केरळ, आंध्र प्रदेश या ठिकाणी टोमॅटो विक्रीसाठी पाठवले. एकूण १४/१५ तोडे झाले असून ९००/१२०० रुपये प्रति कॅरेट विकलं गेलं. चार महिण्यात १५ हजार कँरेट टोमॅटोचे उत्पन्न घेतलं आहे. इतकंच नाहीतर सुभाष माकोडे यांनी त्यांच्या शेतात ४० महिला आणि ३ पुरुषांना दररोज रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

Weather Today : राज्यात किमान तापमान ६ अंशांनी घसरले, ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here