हायलाइट्स:

  • मुंबईत डेल्टा व्हेरियंटची जागा ओमिक्रॉनने घेतली
  • २१ नमुन्यांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि ११ नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट
  • दोन जणांना ऑक्सिजन, १५ रुग्णांना आयसीयूत दाखल करण्याची वेळ

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एकेकाळी करोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग अधिक दिसून येत होता. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग अधिक दिसून येत आहे. (Omicron In Mumbai) मुंबई महापालिकेच्या आठव्या फेरीतील जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टमध्ये करोनाबाधित रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेच्या अहवालानुसार, कस्तुरबास्थित जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत २८० करोनाबाधित रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील २४८ रुग्णांच्या नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आला आहे. तर आठ टक्के म्हणजेच, २१ नमुन्यांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि ११ नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, डेल्टापेक्षा ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

दमा, श्वास घेण्यातील त्रास वाढला
मुंबईची हवा दिल्लीहून प्रदूषित; निर्देशांक दिवसभर होता धोकादायक श्रेणीत

डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉनचा संसर्ग अधिक

२१ डिसेंबर रोजी करोनाची तिसरी लाट मुंबईत सुरू झाली होती. तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉनचा फैलाव अधिक झाल्याचे दिसून आले. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, ओमिक्रॉनने हळूहळू घातक ठरलेल्या डेल्टा व्हेरियंटला मागे टाकलेले आहे. २१ आणि २२ डिसेंबर रोजी ३०० पेक्षा अधिक नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये ३७ टक्के म्हणजेच, १४१ नमुने ओमिक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले. आता सातव्या आणि आठव्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या फेरीत याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सातव्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालात २८२ नमुन्यांपैकी १५६ मध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट असल्याचे स्पष्ट झाले. तर आठव्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालात २८० नमुन्यांपैकी २४८ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आला. काकाणी यांनी सांगितले की, जीनोम सिक्वेन्सिंगच्या आठव्या फेरीतील अहवालात २१ नमुन्यांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि ११ नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला.

९९ रुग्णांनी करोनाचा एकही डोस घेतला नव्हता!

जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातून एक विशेष बाब समोर आली आहे. जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालात ७ नमुने असे होते की, त्या रुग्णांनी करोना प्रतिबंधक लसीचा एकच डोस घेतला होता. त्यातील सहा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली. ९९ रुग्णांनी करोनाचा एकही डोस घेतलेला नव्हता. त्यातील ७६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर दोन डोस घेतलेल्या १७४ पैकी ८९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यातील दोघांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. तर १५ जणांना आयसीयूत दाखल करावे लागले होते.

coronavirus latest update: दिलासा! राज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत होतेय घट; पाहा, ताजी स्थिती!
फैलाव अधिक, लक्षणे कमी;करोनारुग्णांमध्ये संसर्गाची लक्षणे नाहीत

१८ पेक्षा कमी वयाचे १३ रुग्ण

२८० नमुन्यांपैकी १८ पेक्षा कमी वयाच्या १३ रुग्णांचे नमुनेही घेण्यात आले होते. सर्वांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आला होता. या नमुन्यांपैकी ७ नमुने हे १३ ते १८ वयोगटातील रुग्णांचे होते. तर दोन नमुने हे ० ते २ वयोगटातील रुग्णांचे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here