हिंगोली : हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी बहिनाराव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असून यातील आरोपी पळून जात असताना मनमाड येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सावळी बहीनाराव येथील सचिन धुळबा धवसे ( वय ३० ) हे मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणक चालक म्हणून कार्यरत होते. २३ जानेवारी रोजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात रात्री हिराने सचिनचा डोक्यात दगड मारून खून केल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले. ही घटना सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करून या खून तपासाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला.

‘या’ पिकामुळं शेतकरी झाला करोडपती, लॉकडाऊनमध्ये एका महिन्याचा नफा ८० लाख
या प्रकरणी गावात पोलिसांनी विचारणा केली असता गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. यासंदर्भात वारंवार सांगूनही सचिन ऐकत नसल्याने, खून करण्यास सहकार्य करणाऱ्या पंडित पोले यांनी ही माहिती दिली. तसेच सचिनचा खून करून ते दोघे परभणी मार्गे पळून गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी हायटेक यंत्राच्या सहाय्याने मोबाईल लोकेशनवरून या खुनातील मुख्य आरोपी विश्वनाथ धवसे हे छोट्या मुलासोबत मनमाड येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.
Wardha Accident : वर्ध्यात भाजप आमदाराच्या मुलासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाहा अपघातानंतरचा पहिला VIDEO

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here