एसटी संप कधी मिटणार: ST Strike : बडतर्फीच्या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटला, प्रशासनाविरोधात उचललं आणखी एक पाऊल – aurangabad news today st personnel run to the police
औरंगाबाद : वैजापूर डेपोत गेल्या दोन महिन्यांपासून संपावर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी डेपो मॅनेजरसह अन्य काही कर्मचाऱ्यांच्या विरोधात वैजापूर पोलीसांकडे धाव घेतली. या ठिकाणी लेखी अर्ज करून डेपो मॅनेजरसह अन्य काही कर्मचारी संपकरी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला.
वैजापूर येथील जवळपास २६ एसटीच्या कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदन वैजापूर पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल केले. या तक्रार अर्जामध्ये वैजापूर येथील डेपो मॅनेजर हेमंत नेरकर व त्यांच्यासोबत अन्य काही जण संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डेपो मॅनेजर यांनी संपकऱ्यांना तुम्ही तुमच्या हातांनी नुकसान करून घेत आहात. तुमच्यावर निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई करू, असे फोन करून सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला असून, काही बरे वाईट झाल्यास डेपो मॅनेजर जबाबदार असतील असे पत्र देण्यात आले आहे. दारात वरात आली, लग्नाच्या विधी सुरू झाल्या अन् आला एक फोन, क्षणात घडलं भयंकर ‘आरोपांत तथ्य नाही’
या पत्रासंदर्भात डेपो मॅनेजर हेमंत नेरकर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, ‘तक्रार देणाऱ्यांपैकी १२ जणांना एसटीच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सात जणांची बदली करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना बोलण्याच्या काहीच विषय नाही. अन्य कर्मचाऱ्यांनाही आम्ही बोललेलो नाही. जे कर्मचारी माझ्या डेपोचे नाहीत किंवा महामंडळाचे कर्मचारी नाहीत, त्यांना कामावर हजर राहण्याबाबत बोलताच येत नाही.’
संपकऱ्यांच्या विरोधात तक्रार
एका अन्य प्रकरणात पैठण आगारात एका कर्मचाऱ्याला संपात सहभागी झाल्याबद्दल १३ लाख ६७ हजार ६७० रुपये नुकसान झाल्याने ४८ तासांत खुलासा करा, असे महामंडळाचे पत्र व्हायरल करण्यात आले होते. या प्रकरणाची पैठण आगाराकडून शहनिशा करण्यात आली. सदर पत्र बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट पत्राआधारे कामगारांमध्ये भीती पसरविली जात आहे. या प्रकरणात बनावट पत्र व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात कारवाईची मागणीचे पत्र पैठण पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.