हायलाइट्स:

  • धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न प्रवाशाचा अंगलट
  • वसई रोड रेल्वे स्थानकातील घटना
  • रेल्वे स्थानकातील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

वसई : पश्चिम रेल्वेवरील वसई रोड रेल्वे स्थानकातील थरारक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या एक्स्प्रेमध्ये चढण्याचा प्रयत्न एका प्रवाशाच्या अंगलट आला. धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना तोल जाऊन तो प्रवासी ट्रेन आणि फलाटाच्या मोकळ्या जागेत पडला आणि बराच अंतर फरफटत गेला. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वसई रोड रेल्वे स्थानकावर रविवारी पावणे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर राजस्थानकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चढत असताना प्रवाशाचा तोल गेला. त्यानंतर तो खाली पडला. एक्स्प्रेस आणि फलाटाच्या मध्यभागी पडून तो फरफटत गेला. एक्स्प्रेस आणि फलाटाच्या मधल्या मोकळ्या जागेतून तो धावत्या ट्रेनखाली जाणार, तोच एका रेल्वे पोलिसाने धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता त्याने या प्रवाशाला बाहेर ओढले. इतर प्रवाशांच्या मदतीने त्यांनी त्याला फलाटावर आणले आणि त्या प्रवाशाचा जीव वाचवला.

१० वर्षांच्या सईची कमाल; ९ राज्ये, ४ हजार किलोमीटर सायकलने प्रवास; आठव्या वर्षी समुद्रात पोहण्याचा विक्रम

काय घडलं नेमकं?

एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. पाठीवर बॅग असलेल्या एका प्रवाशाने धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. एक्स्प्रेस पुढे जात असतानाही त्याला एक्स्प्रेसच्या डब्यात चढता आले नाही. या प्रवाशाचा तोल गेला आणि तो फलाटावर पडला. बराच अंतर तो फलाटावरून फरफटत पुढे गेला. त्याचा हात सुटला आणि तो फलाट आणि एक्स्प्रेसच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेतून खाली खेचला जाणार होता, तोच तिथे असलेल्या रेल्वे पोलिसाने त्याच्या पायाला धरून बाहेर ओढले. त्यामुळे या प्रवाशाचा जीव वाचला.

Omicron In Mumbai : मुंबईत तिसरी लाट ओमिक्रॉनची; ‘या’ रिपोर्टने भरवली धडकी

मागील वर्षात ४७ जणांचा वाचवला जीव

मध्य रेल्वेवरील पोलिसांनी मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये जवळपास ४७ प्रवाशांचा जीव वाचवला आहे. मुंबई आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांवर या सर्व घटना घडल्या होत्या. एकट्या कल्याण रेल्वे स्थानकात ११ जणांचा जीव वाचवला. दादर येथे १०, ठाण्यात ६, एलटीटी ४, पनवेल – ३ आणि कुर्ला आणि वडाळा येथे प्रत्येकी २, तर तुर्भे, टिटवाळा, रोहा, कसारा, डोंबिवली, घाटकोपर, भायखळा, दिवा, सीएसएमटी या स्थानकांवर प्रत्येकी एका प्रवाशाचा जीव वाचवला. लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये चढताना सर्वाधिक घटना घडल्या आहेत.

kalyan turtles : कल्याणमधील तलावात १०० हून अधिक कासवांचा मृत्यू, ‘ही’ असू शकतात कारणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here