हायलाइट्स:

  • प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातील १० जणांची निवड
  • प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार
  • सीरमच्या डॉ. पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर

पुणे : केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातील १० जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया या लस उत्पादक कंपनीचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह कला, आरोग्य, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील इतर ८ जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. (padma awards 2022 winners list)

प्रभा अत्रे यांची कला क्षेत्रातील योगदानाबाबत पद्मविभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसंच डॉ. सायरस पूनावाला आणि उद्योगपती नटराजन चंद्रशेखरन यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

Padma Awards 2022: बिपीन रावत, कल्याणसिंह, प्रभा अत्रेंना पद्मविभूषण; हे आहेत पद्मचे मानकरी

राज्यातील ७ जणांना पद्मश्री

डॉ. हिंमतराव बावसकर, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. भीमसेन सिंघल आणि डॉ. बालाजी तांबे यांना आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी तर गायिका सुलोचना चव्हाण आणि गायक सोनू निगम यांना कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अनिल कुमार राजवंशी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे.

पद्मविभूषण पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रभा अत्रे कोण आहेत?

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचं प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगिताचा जगभर प्रसार करण्यात त्यांचे मोठे योगदान गणलं जातं.

प्रभाताईंचा जन्म पुण्यात आबासाहेब व इंदिराबाई अत्रे यांचे पोटी झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरित होऊन प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारताच्या विविध भागांत होणाऱ्या कार्यक्रमांत साथ करत असत. संगीत शिकत असतानाच प्रभाताईंनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगितात डॉक्टरेटही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here