हायलाइट्स:

  • काँग्रेसला मालेगावमध्ये मोठा धक्का
  • महापौर ताहेरा शेख आणि २७ नगरसेवकांची सोडचिठ्ठी
  • लवकरच राष्ट्रवादीत करणार प्रवेश

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मालेगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण माजी आमदार रशीद शेख यांच्यासह महापौर ताहेरा शेख आणि २७ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. येत्या गुरुवारी हे सर्वजण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. (मालेगाव महानगरपालिका)

मालेगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच बालेकिल्ल्याला आता मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच सुरुंग लावला आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारासह तब्बल २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला खिंडार पडलं आहे.

Buddhadeb Bhattacharjee: वादाची ठिणगी! बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण स्वीकारण्यास दिला नकार; म्हणाले…

शहरात याआधी माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता. आता त्यांचे वडील माजी आमदार रशीद शेख तसंच आई महापौर ताहेरा शेख हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. शेख कुटुंबीय हे काँग्रेसचे निष्ठावंत कुटुंब मानले जात होते. मात्र या कुटुंबाला आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here