औरंगाबाद : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. शहरातील एक उद्घाटन कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी अजिंठा आणि वेरूळ लेणी ला भेट देणार आहेत. तर याचदरम्यान पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिकांनी आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेटून आमच्या समस्या समजून घ्याव्यात अशी मागणी केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे याचं मंगळवारी दुपारी ३ औरंगाबाद येथे आगमन होईल. त्यानंतर लगेच ३ वाजून १५ मिनीटांनी चिकलठाणा विमानतळ ते जिजामाता चौक एल.ई.डी. स्ट्रीट लाईट लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडणार. त्यानंतर दुपारी ३.३० मिनिटांनी खाम इको पार्कचा लोकार्पण सोहळा पार पडणार. तसेच त्यानंतर अनेक विकास कामांचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते होणार. उद्घाटननंतर सायंकाळी ५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद जिल्हयाची पर्यटन विषयक आढावा बैठक.

नितेश राणेंची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी
यानंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद विभागातील माझी वसुंधरा अभियान आढावा बैठक होणार आहे. बैठक झाल्यावर आदित्य ठाकरे ६.४५ मिनिटांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे औरंगाबाद मध्ये मुक्काम करत दुसर्‍या दिवशी ( गुरुवारी ) अजिंठा-वेरूळ लेणी ची पाहणी करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मोटारीने नाशिककडे रवाना होणार आहे.

आमची समस्या जाणून घ्या साहेब.….

मार्चमध्ये लॉकडाऊनला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात जवळपास पर्यटन व पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय बंद आहेत. यात छोटे व्यावसायिक, बस, टॅक्सी, हॉटेल, गाईड आणि टूर ऑपरेटर्सचा समावेश आहे. मात्र पर्यटन वगळता इतर सर्व उद्योग व व्यवसाय कोविड अटी व शर्थीसह सुरू आहेत. त्यामुळे या दौऱ्यात आम्हाला प्रत्यक्ष भेटून आमचे म्हणणे ऐकून घेऊन आम्हाला सुद्धा न्याय द्यावा, अशी मागणी औरंगाबाद दुरिजम डेव्हलपमेंट फाइंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here