औरंगाबाद न्यूज लाइव्ह: एका दानवेंची डब्बा पार्टी, दुसऱ्या दानवेंचं वन भोजन! – union minister of state for railways and senior bjp leader raosaheb danve dabba party
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे पक्षातील तरुण कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टी करत संवाद साधत आहेत. दानवेंच्या याच डब्बा पार्टीची चर्चा सुरू असतानाच, आता आणखी एका दानवेंच्या वन भोजनाची चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या रस्त्यात थांबवून केलेल्या वन भोजनाची अशीच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रावसाहेब दानवेहे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील तरुण कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टीच आयोजन करत संवाद साधत आहेत. तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील कार्यकर्त्यांना चार्ज करत, कामाला लागा असा मॅसेज देत आहे. त्यांच्या याच डब्बा पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. तर आता शिवसेनेचे दानवे याचं वनभोजन सुद्धा चर्चेचा बनला आहे. शिवसंवाद मोहीम दरम्यान कन्नड दौऱ्यावर असताना एका शेत शिवारात थांबून अंबादास दानवे यांनी सहकाऱ्यासोबत जेवणाचा आनंद घेतला. त्यांच्या या वनभोजन करतानाचे फोटो व्हायरल होत आहे. Weather Alert Maharashtra : राज्यात हुडहूडी, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद रोहित पवारांच्या कारखान्याला ऊस देणारा नाही…
कन्नड येथील शिवसंवाद मोहीम अंतर्गत शिवसैनिकांच्या बैठकीत बोलताना अंबादास दानवे यांनी, आमदार रोहित पवारांच्या बारामती ऍग्रो कन्नड साखर कारखान्याला इशारा दिला आहे. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस अगोदर घ्या, अन्यथा बाहेरील तालुक्याचा ऊस घेऊ देणार नाही असा इशारा दानवे यांनी दिला आहे.
शिवसंवाद मोहिमेचा धडाका…
१५ जानेवारीपासून औरंगाबाद जिल्हात ‘शिवसंवाद मोहिमे’ची सुरवात करण्यात आली आहे. १५ दिवसांच्या या मोहिमेत अंबादास दानवे स्वतः जिल्ह्यातील विविध गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची माहीती घेत आहे. त्यांच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळताना पाहायला मिळतोय.