डीएमके जावली सहकारी बँकेत (DMK Jaoli Cooperative Bank) गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत एका महिलेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

सातारा
हायलाइट्स:
- जावली सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप
- पोलीस दखल घेत नसल्यानं महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
- पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला!
ज्योती नलावडे असं या महिलेचं नाव आहे. जावली सहकारी बँकेचं संचालक मंडळ व काही कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा तिचा आरोप आहे. ज्योती नलावडे यांनी या संदर्भात पोलीस तक्रार दाखल केली होती. संचालकांवर कारवाई करून दोषारोप दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळं संतापलेल्या नलावडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज सकाळीच त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्या आणि स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळी त्यांना रोखल्यानं अनर्थ टळला.
वाचा: राज्यातील दोन मंत्र्यांच्या बायका माझ्याप्रमाणेच त्रस्त; करुणा मुंडे यांचा नवा गौप्यस्फोट
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून