बीड : आज संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड पोलीस मुख्यालयावर एकाचा धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला आहे. झेंड्याच्या समोरच अंगावर डिझेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लाल परीची चाकं अखेर धावली, ‘या’ जिल्ह्यात १०४८ कर्मचारी कामावर हजर

बीड शहरातील पंचशील नगर भागातील रस्त्याच्या बोगस कामाची तक्रार करूनही कारवाई न झाल्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे. विनोद शेळके असं आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीचं नावं आहे तर धनंजय मुंडे यांच्यासमोर आणि झेंडावंदन स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास सुरू आहे.
एका दानवेंची डब्बा पार्टी, दुसऱ्या दानवेंचं वन भोजन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here