औरंगाबाद : शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेली आहेत. पण संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पडलेल्या फुटीनंतर अनेक कर्मचारी कामावर हजर होत असताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ टक्के एसटी कर्मचारी कामावर हजर झाले असून, उरलेले कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २ हजार ६८९ कर्मचारी असून, त्यातील १०४८ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. ज्यात १२०० बसचालक असून त्यातील १४८ बसचालक कामावर हजर झाले आहेत. तर ९०० वाहक असून,त्यातील २०२ वाहक कामावर हजर झाले आहेत. तर १ हजार ६४१ कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत.

Weather Alert Maharashtra : राज्यात हुडहूडी, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

एसटी सुसाट…!

एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याने लाल परी पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ५३६ बसगाड्या आहेत. तर यातील १५० ते २०० गाड्या रोज धावत आहेत. तसेच एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्याची निर्णय घेतला असून, त्यानुसार जिल्ह्यातील ३४ माजी कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहे. तर त्यातील ७ जण कामावर रुजू झाले आहेत.

काम शोधण्याची वेळ…

संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट असून,त्यांच्यावर इतर खाजगी ठिकाणी काम शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर औरंगाबाद विभागातील आतापर्यंत ८८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर १५७ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे.

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक, मागण्यांसाठी शिवनेरी ते मुंबई आक्रोश वाहन यात्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here