पॅरिसः करोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. जगात करोनाच्या बळींची संख्या ४० हजारांवर गेली आहे. तर ८ लाखांहून अधिक जण करोना पॉझिटिव्ह आहेत. एकट्या अमेरिकेत करोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजारांवर गेली आहे. ४० हजार मृतांपैकी २९, ३०५ हे युरोपातील आहे. इटली आणि स्पेनमध्ये करोनाचे तांडव सुरू आहे. लॉकडाऊनमुळे युरोपातील ५० हजार नागरिकांचे प्राण वाचले, असं ब्रिटनमधील एका अभ्यासातून समोर आलं आहे.

अमेरिकेने चीनला मागे टाकले

अमेरिकेत करोना व्हायरसने मृतांची संख्या वाढली असून चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये करोनाने ३३०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत करोनाने ३,४१५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील गेल्या शतकातील नैसर्गिक आपत्तीतील मृतांची ही सर्वांत मोठी संख्या आहे. करोनाचे केंद्र असलेल्या चीनमधील वुहानमधून आता करोना जगातील १८३ देशांमध्ये पसरला आहे.

इटली, स्पेनमधील मृतांची सरासरी अधिक

युरोपात स्पेनमध्ये ८४९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये ८३७ जणांनी जीव गमावला आहे. या आधी इटलीत मृतांची संख्या दिवसाला ९७०पर्यंत पोहोचली होती. इटलीतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही एक लाखाच्यावर गेली आहे. तर स्पेनमध्ये करोनाच्या रुग्णांच्या आकडा लाखाजवळ पोहोचला आहे.

ब्रिटन, इराणमध्येही करोनाचे थैमान

करोना व्हायरसने मंगळवारी ब्रिटनमध्ये ३८१ जणांचा मृत्यू झाला. करोनाने होणाऱ्या मृत्यूंचा एक दिवसातला हा सर्वात मोठा आकडा आहे. ३० मार्चच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ब्रिटनच्या हॉस्पिटल्समध्ये करोनाच्या मृतांचा आकडा १,७८९वर पोहोचला होता. इराणमध्येही मंगळवारी करोनाने १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे इराणमधील मृतांची एकूण संख्या २,८९८ इतकी झाली आहे. इराणमध्ये आणखी ३१११ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे इराणमधील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४, ६०६ इतकी झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here