हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव खरेदी ऑफिस मध्ये तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन केले जात असून, पैशा पोटी सबरजिस्टर मौजे तळणी येथील दस्त क्रमांक २४/२२व २५/२२ व २३/३२ दी.०३/०१/२०२२ तुकडे बंदी कायद्याचे भंग होणारे तीन दस्त हे मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाण-घेवाण करून कोणतीही चौकशी न करता त्वरित दस्त केलेले आहेत. असे विविध मागण्या त्यांनी अर्जामध्ये नमूद करून अधिकारी साहेब यांनी या प्रकरणाची चौकशी करावी मागणी या पत्रामध्ये केली आहे. सोबतच चौकशी न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी ह्या पत्रामधून दिला होता. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आज मिलिंद परदान यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ एकच खळबळ उडाली होती.
बीडमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न, धनंजय मुंडे उपस्थित असताना…
बीड पोलीस मुख्यालयावर एकाचा धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला आहे. झेंड्याच्या समोरच अंगावर डिझेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.