हायलाइट्स:

  • किरीट सोमय्या नगरविकासखात्याच्या कार्यालयात बसले असताना छायाचित्र कोणी काढले
  • आम्हाला ती व्यक्ती कोण, हे माहिती आहे

मुंबई : मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राज्य सरकारने नोटीस पाठवल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) चांगलेच संतापले आहेत. सरकारी कार्यालय हे कोणाच्या बापाच्या मालकीचे नसते. सरकारने किरीट सोमय्या (किरीट सोमय्या) यांना कोणत्या अधिकारात नोटीस पाठवली, असा रोकडा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. मी बापाच्या मालकीचा हा शब्द जाणीवपूर्व वापरत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राज्य सरकारचं डोकं फिरलं आहे. अण्णा हजारे यांच्या संघर्षानंतर सामान्य नागरिकांना माहिती अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे कुठल्याही सरकारी कार्यालयात जाऊन रितसर पाहणी करण्याचा अधिकार सामान्य माणसाला आहे. किरीट सोमय्या यांनी याच अधिकाराचा वापर केला. सरकारी कागदपत्र तपासताना खुर्चीवर बसणे हादेखील त्यांचा अधिकार आहे. सरकारी कार्यालय हे कोणाच्या बापाच्या मालकीचे नसते. पण राज्य सरकार ही कार्यालये म्हणजे आपली खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे नोटीस पाठवत आहे. सरकारने किरीट सोमय्या यांना कोणत्या अधिकाराखाली नोटीस बजावली, हे सांगावे, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
kirit somaiya: किरीट सोमय्यांना अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसणे भोवणार?; प्रशासनाने धाडली नोटीस
तसेच किरीट सोमय्या नगरविकासखात्याच्या कार्यालयात बसले असताना छायाचित्र कोणी काढले, हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आम्हाला ती व्यक्ती कोण, हे माहिती आहे. ज्या व्यक्तीने फोटो काढला त्यानेच तक्रार केली आहे. ही सगळी मिलीभगत आहे. चोरी करायची आणि ती उघड करण्याचा प्रयत्न कोणी केलाच तर त्याला बदनाम करायचे, असा सर्व प्रकार सुरु असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
किरीट सोमय्यांची ‘सरबराई’ मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पडली महागात, मुख्यमंत्र्यांकडून निलंबनाचे आदेश?
मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीची नवी उंची गाठेल: फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. आमचं प्रजासत्ताक, आमचा देश प्रगतीकडे जावो, लोकशाही चिरायू होवो, असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देश पुढे चालला आहे. मला विश्वास आहे, शेवटच्या माणसाचा विचार करणारं सरकार, देशाला प्रगतीच्या वेगळ्या सोपानावर घेऊन जाईल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी मुंबईच्या मालाड परिसरातील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यावरुन निर्माण झालेल्या वादासंदर्भातही भाष्य केले. हिंदूंवर अत्याचार केले तो टिपू सुलतान तो आमचा देश गौरव होऊ शकत नाही. त्यामुळे महापालिका मैदानाला त्यांच नाव देऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here