बीड : बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांचे थकित वेतन मिळावे, या मागणीसाठी आज सकाळपासूनच दोन महिलांनी झाडावर चढून आंदोलन केले होते. दरम्यान, याच आंदोलनस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर पोहचले.

महिलांना झाडावर चढविल्याने आंदोलन प्रमुखावर पालकमंत्री धनंजय मुंडे चांगलेच संतापले होते. तर या महिलांना झाडावरून खाली उतरविण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले, आमदार क्षीरसागर यांच्या विनंती नंतर आंदोलनकर्त्या महिला खाली उतरल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनी एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा निर्णय, ३ महिन्यापासून पगार मिळाला नाही म्हणून…
नगराध्यक्ष काका भारतभूषण क्षीरसागर यांनी वेतन रखडले. म्हणून कामगार महिला झाडावर चढल्या आणि पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वचन देत आंदोलनकर्त्या महिलांना खाली उतरविल्याने जिल्हाधिकारी परिसरात चर्चला उधाण आले. मात्र, आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाची चर्चा राज्यभर होत असलेले पाहायला मिळत आहे.

एकीकडे ध्वज वंदना वेळीच एकाने अंगावर डिझेल ओतून पेटवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगरपरिषद महिला कर्मचारी आपल्या मागण्या मांडण्यासाठी चक्क झाडावर दोन तास आत्मदहन करण्यासाठी उभ्या होत्या. मात्र, पालकमंत्री व आमदार यांनी सर्व आंदोलकांना आश्वासन देत या सगळ्या गोष्टी थांबल्याचे पाहायला मिळालं. मात्र, या दोन घटनेमुळे जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे.

यामध्ये दस्तुरखुद्द आमदार संदीप शिरसागर यांनी झाडावर चढलेल्या नगरपरिषद महिला कर्मचारी यांना उतरवण्यासाठी स्वतः झाडावर चढून त्यांना आश्वासन देऊन खाली उतरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आमदार संदीप क्षिरसागर स्वतः झाडावर चढले ही चर्चा रंगली होती.

लाल परीची चाकं अखेर धावली, ‘या’ जिल्ह्यात १०४८ कर्मचारी कामावर हजर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here